औरंगाबाद : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘पद्मावत’ सिनेमावर वाद सुरू असताना यावरून एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 


मुस्लिम १४ टक्के असूनही लाचार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद येथील सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘देशात राजपूतांची लोकसंख्या केवळ ४ टक्के आहे. तरीही सरकारला त्यांच्या मागण्यांपुढे झुकावे लागले. या तुलनेत देशात मुस्लिमांची संख्या १४ टक्के आहे. पण ते लाचार आहेत. सरकार त्यांना दुर्लक्षित करून जबरदस्तीने तीन तलाक कायदा तयार करत आहे. याबाबत मुस्लिमांची बाजू ऎकण्यासाठी कोणतीही कमेटी नेमली गेली नाही’.


काय म्हणाले ओवेसी?


ते म्हणाले की, ‘मुस्लिम महिलांच्या हक्काचं सांगत तीन तलाक कायदा आणला गेला, पण हे तर केवळ कारण आहे. खरा निशाणा शरियत आहे. ओवेसी म्हणाले की, बजेटमध्ये सरकारने घटस्फोटीत मुस्लिम महिलांसाठी १५ हजार रूपये महिना मिळण्याची सोय करावी. यावेळी मोदींवर टोला लगावत ते म्हणाले की, १५ लाख नाहीतर १५ हजार तरी द्या मित्रो. 


‘पद्मावत’ला विरोध


तरूणांनी ‘पद्मावत’ सिनेमा बघण्यात वेळ घालवू नये, असे आवाहन ओवेसी यांनी केलंय. सिनेमाबाबत बोलताना काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, ‘हा सिनेमा बघण्यात वेळ खर्ची करू नका. हा सिनेमा बघू नका. देवाने तुम्हाला दोन तासाचा सिनेमा बघण्यासाठी नाही बनवलंय’.


मुस्लिमांनी शिकावं...


‘नरेंद्र मोदी यांनी या सिनेमासाठी एक १२ सदस्यांची समिती तयार केली. पण कुणीही आमच्या विरोधातील कायदा(तीन तलाक) तयार करताना काहीही विचारलं नाही. मुस्लिम समुदायाने राजपूतांपासून काहीतरी शिकायला हवं, जे सिनेमा रिलीज होऊ न देण्यासाठी एकजुट आहेत’.