COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक असलेलेल आशिष कचोलिया यांनी 2022 मध्ये नवीन शेअर्समध्ये गुंतवणूक सुरूच ठेवली आहे. कचोलिया यांनी केमिकल कंपनी फिनोटेक्स केमिकल लिमिटेडमध्ये 1 टक्के शेअर्सची खरेदी केली आहे. 


Fineotex Chemicals: 1 वर्षात 112 % परतावा


फिनोटेक्स केमिकल्स एक मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. फिनोटेक्सचा शेअरमध्ये मागील एका वर्षाच्या दरम्यान, 121 टक्क्यांहून जास्त तेजी नोंदवली आहे. तर 5 वर्षात 355 टक्क्यांचा जास्त रिटर्न मिळाला आहे. मागील 52 आठवड्यांमध्ये या स्टॉकने 178 रुपयांचा उच्चांक आणि 56.60 रुपयांचा सर्वात कमी स्तर नोंदवला आहे.


आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये 34 शेअर


दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया (Ashish Kacholia)यांच्या पोर्टफोलिओमध्ये साधारण 34 शेअर्स आहेत. यामध्ये हॉस्पिटलिटी, एज्युकेशन, इंफ्रा आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबधीत शेअर्स आहेत.