Shark Tank India : गेल्या काळात टीव्हीवर प्रचंड फेमस झालेला शो म्हणजे शार्क टॅन्क इंडिया (Shark Tank India). या टीव्ही शो (Tv show) मुळे अनेकांच्या मनात आपणही स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो, आपणही नोकरीपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो अशी भावना निर्माण झाली, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. या शोमध्ये लहानांपासून ते वयस्कांपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. कार्यक्रमातील शार्क्सकडून स्वतःच्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न केला. या शो च्या माध्यमातून काही प्रसिद्ध उद्योजक घरा-घरांमध्ये पोहोचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील नागरिक त्यांना अधिक जवळून ओळखायला लागले. अशात आता या शो चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि ज्याची प्रेक्षकांना शंका होती तेच होताना पाहायलाही मिळतंय. दुसऱ्या सीझनमध्ये कार्यक्रमात काही महत्त्वाचे फेरबदल होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या सीझनमध्ये शार्क अश्निर ग्रोव्हर (Ashneer Grover) आपल्याला पाहायला मिळणार नाहीत.


परदेशात या शो चे अनेक सीझन्स याआधीच होऊन गेले आहेत. मात्र भारतात Shark Tank India चा पहिलाच सिझन पार पडला आहे. अशात आता दुसऱ्या सिझनची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार येणाऱ्या दुसऱ्या सीझनमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. अशात पहिल्या सीझनप्रमाणे दुसरा सिझन तेवढाच हीट होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


अश्निर ग्रोव्हर, कायम चर्चेत राहिलेला माणूस 


खरंतर अश्निर ग्रोव्हर यांची सर्वाधिक चर्चा भारत पे मध्ये झालेल्या प्रकरणानंतर झाली. मात्र त्या आधीच शार्क टॅन्क मध्ये असताना अश्निर कायम बातम्यांमध्ये असायचे. अश्निर यांची बोलण्याची रोखठोक पद्धत यामुळे ते शार्क टॅन्क मधील सर्वाधिक चर्चेतील परीक्षक आणि गुंतवणूकदार राहिले आहेत. 


मागच्या सीझनमध्ये हे होते परीक्षक आणि गुंतवणूकदार


शार्क टॅन्क इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये विनिता सिंह, पियुष बन्सल, नमिता थापर, अनुपम मित्तल, अमन गुप्ता यांच्यासोबत अश्निर ग्रोव्हर हे परीक्षक आणि गुंतवणूकदार होते. 


अश्निर ग्रोव्हर त्यांच्या जागी कोणता शार्क? 
  
बोलण्याच्या आपल्या रोखठोक शैलीमुळे अश्निर ग्रोव्हर यांनी प्रेक्सकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अश्निर ग्रोव्हर हे भारत पे या संस्थेचे को फाऊंडर आहेत. मात्र आता येणाऱ्या दुसऱ्या सीझनमध्ये अश्निर यांना अमित जैन रिप्लेस करणार असल्याचं बोललं जातंय. अमित जैन हे कार देखो या ग्रुपचे को फाऊंडर आहेत.