नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केल्यानंतर आता काँग्रेसकडून भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. इंदिरा गांधी यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न, अशा शब्दात काँग्रेसने प्रत्त्युत्तर दिलंय. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आणीबाणीची आठवण काढली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आज शिळ्या कडीला ऊत आणला जातोय... आणिबाणीची आठवण आजच का आली? निवडणुका जवळ आल्यामुळे आणिबाणीचा मुद्दा रेटला जातोय' अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केलीय.  


'सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे... लोकांना बोलण्याची मुभा आज नाही... ही आणीबाणी भाजपनेच आणलीय' असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही टीका केलीय.