नवी दिल्ली : प्रद्युम्न हत्याकांड प्रकरणात जामिनावर सोडण्यात आलेल्या कंडक्टर अशोकने हरियाणा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस कोठडीत थर्ड डिग्री देऊन छळ करण्यात आल्याचा आरोप अशोकने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उलटे टांगून मला मारण्यात आले, इलेक्ट्रीक शॉक दिले गेले आणि ती प्रद्युम्नच्या हत्येचा गुन्हा माझावर दाखल केला गेला. कंडक्टर अशोक मंगळवारी आपल्या घरी आले आहेत. जामिनावर अशोकची सूटका केली आहे.


प्रसारमाध्यमं आणि देवाचे आभार


अशोकने म्हटलं आहे की, मी माध्यमांचे आभार मानू इच्छितो. मी माझा मुलाजवळ आलो. ईश्वराचे आभार. पोलिसांनी मला खूप मारहाण केली आणि छळ केला. त्याच्या मला खूप वेदना होत आहेत.


प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांच्या मागणीवरून सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करीत आहे. पुरावे नष्ट करण्याचा हरियाणा पोलिसांवर सीबीआयने आरोप केला आहे तर अशोक विरोधात कोणताही पुरावा नसल्याचं सीबीआयने म्हटले आहे. याव्यतिरिक्त, शाळेतील अकरावीच्या विद्यार्थ्याना अटक करण्यात आली आहे.


अशोकच्या पत्नीचे आरोप


मॅडमच्या सांगण्यावरुन माझ्या पतीने मुलाला मदत केली होती. पण हे माहित नव्हतं की त्यांनाच यामध्ये फसवलं जाईल. पोलिसांनी माझ्या पतीला मारहाण केली आणि छळ केला. माझ्या पतीला उलटं लटकवून आणि गुंगीचं इंजेक्शन देऊन हत्येची कबुली देण्यास सांगितले.


दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अशोक तुरुंगात होता. न्यायालयाने अशोकला 50 हजारच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अशोकने देव आणि प्रसारमाध्यमांचे आभार मानले आणि म्हणाले की सत्य जिंकले आहे.