पटना : केंद्रीय आयुष मंत्रालय गोमुत्रापासून औषधे बनवून कॅन्सरवर उपाय शोधण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मोदी सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री आणि बक्सर लोकसभा क्षेत्राचे खासदार आश्विनी चौबे यांनी म्हटले. गाईच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकार काम करत असल्याचेही ते म्हणाले. तामिळनाडूतील कोयम्बटूर येथे बोलत होते.विविध प्रकारच्या औषधांमध्ये गौमुत्राचा उपयोग केला जातो. तसेच गोमुत्राचा उपयोग कॅन्सरसारख्या आजारांवर केला जात आहे. यामध्ये देशी गायींच्या गोमुत्राचा उपयोग जास्त होत असल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मधुमेह आणि कॅन्सरसारखे आजार साऱ्या जगासाठी आव्हान बनले आहेत. हे मुळापासून नष्ट करु असे आम्ही म्हणणार नाही पण आपण याला नियंत्रणात नक्की आणू शकतो. यासाठी भारत सरकारने २०३० पर्यंत वेळ निश्चित केल्याचे ते म्हणाले. 


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत अंतर्गत कॅन्सरवर उपचार करण्यावर विचार सुरु असल्याचेही आरोग्य राज्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.