श्रीनगर : जम्मू - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावाद्यांनी स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानचा झेंडा फडकावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू - काश्मीरचा फुटीरतावादी नेता आसिया अंद्राबी यांनी शुक्रवारी पाकिस्तानचा झेंडा फडकावत स्वातंत्र्याची मागणी केली. यावेळी, त्यानं जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याच्या घोषणाही दिल्या. भारत जबरदस्तीनं हा भाग बळकावत आहे. प्रत्येक मुसलमान असो किंवा 'काफीर' तो मुस्लिम देशाचा नागरिक आहे आणि तो मुस्लिम देश म्हणजे पाकिस्तान... पाकिस्तानची निर्मिती राष्ट्राच्या आधारावर नाही तर इस्लामच्या पायावर झालीय, असंही आसियानं यावेळी म्हटलं.


यानंतर आसियाविरुद्ध कलम १३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, आसियानं हे कृत्य काही पहिल्यांदाच केलेलं नाही. याआधीही आसियानं ऑगस्ट २०१७ जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावत पाकचं राष्ट्रगीतही गायलं होतं. 


'द्राबी दुखतरान-ए-मिल्लत' (देशाची मुलगी) नावाच्या एका संस्थेचा आसिया हा प्रमुख आहे. ही एक फुटीरवातावादी संघटना आहे, जी उघडपणे पाकिस्तानमध्ये जाण्याची भाषा करताना दिसते.