नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममध्ये गेल्या काही दिवसात आलेल्या पूरात ऐंशीहून अधिक लोकांचा बळी गेलाय. तर हजारो हेक्टर जमीनीवरची पिकं नष्ट झाली आहेत. पुराच्या तडाख्यात २६ जिल्ह्यातल लोकांचं स्थलांतर करावं लागलं आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय.


आसामप्रमाणेच नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्येही पुराचा कमी अधिक प्रमाणात फटका बसलाय. या सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही आज मोदींना गुवाहाटीमध्ये भेटणार आहेत. 


पंतप्रधान मदत निधीमधून आसाममध्ये पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख तर गंभीर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजाराची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. आज आढावा बैठकीत आणखी मदत देण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा होईल.