Shocking News : एका महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या होणाऱ्या नवऱ्यालाच अटक केल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीने बनावट ओळख सांगत महिला पोलीस अधिकाऱ्याशी ओळख वाढवली. इतकंच नाही तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. चौकशीनंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसाममधल्या नागांव जिल्ह्यातील ही घटना आहे. नागांव पोलीस स्टेशनच्या प्रभारी सब इन्स्पेक्टर जोनमनी राभा यांनी आपला होणारा नवरा राणा पगग याला धोकाधडीच्या प्रकरणात अटक केली.


सब इन्स्पेक्टर जोनमनी राभा यांची जानेवारी 2021 मध्ये एका कार्यक्रमात राणा पगग याच्याशी ओळख झाली. यावेळी राणा पगगने आपण ONGC मध्य जनसंपर्क अधिकारी असल्याचं सांगितलं. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांनी राणा पगगने जोनमनी यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. जोनमनी यांनी ही हा प्रस्ताव स्विकारला. यानंतर जोनमनी आणि राणा पगग यांच्या कुटुंबियांचीही भेट झाली. ऑक्टबर 2021 मध्ये त्यांचा साखरपूडा झाला. तर नोव्हेंबर 2022 मध्ये लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. 


जोनमनी आणि पगग यांच्या साखरपुडा झाल्यानंतर भेटीही वाढत गेल्या. पण यादरम्यान जोनमनी यांना राणा पगगच्या कामावर संशय येऊ लागला. जोनमनी यांनी स्वत: पब्लिक रिलेशन आणि अॅडव्हरटाईजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे. त्यामुळे तीने राणा पगग याची माहिती काढायला सुरुवात केली. तपासानंतर तिचा संशय खरा ठरला.



राणा पगग याचा ONGC शी काहीही संबंध नव्हता. ONGC मध्ये कंत्राट देण्याच्या नाखाली त्याने काही लोकांची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूकही केली होती. इतकंच नाही तर राणा पगग जी अलिशान गाडी वापरत होता, तीही त्याने भाड्याने घेतली होती. हाय प्रोफाईल अधिकारी वाटवं यासाठी तो आपल्याबरोबर एक बॉडीगार्डही ठेवत होता.


सत्यपरिस्थिती कळल्यानंतर जोनमनी राभा यांनी राणा पगग अटक केली. त्याच्याकडून बनावट कागदपत्र, बोगस आयडी कार्ड, एक लॅपटॉप, काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.