नवी दिल्ली : बेकायदेशीर दारूच्या धंद्याबद्दल तक्रार करणाऱ्या महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली.


धक्कादायक घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारूमाफीयांनी तिला बेदम मारहाण करत तिच्या अंगावरील कपडे फाडले. दिल्ली महिला आयोगाने याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी पोलीसांनी चार महिलांना अटक केली आहे. 


काय आहे प्रकरण ?


हाती आलेल्या माहितीनुसार, नशा मुक्ती पंचायतची कार्यकर्ती असलेली या महिलेने नरेला भागात सुरू असलेल्या  बेकायदेशीर दारूच्या धंद्याबद्दल पोलीसांत व दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
६ डिसेंबरच्या रात्री डीसीडब्लूच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्या टीमसह या भागात छापा घातला. यात एका घरातून ३५० दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. त्यावेळी दारू माफियांनी तक्रार करणाऱ्या महिलेला धमकी देखील दिली होती. 


दारू माफियांनी केला हल्ला 


गुरूवारी सुमारे १०-१२ दारू तस्करी करणाऱ्यांनी महिलेच्या घरावर हल्ला केला. यात काही महिलांचाही समावेश होता. पीडित महिलेवर रॉ़डने वार करण्यात आला. त्यानंतर तिचे कपडे फाडून तिला रस्त्यावर आणून मारले. 
दिल्ला महिला आयोगाने या घटनेचा निषेध करत पोलीसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीसांनी चार महिलांना अटक केली असली तरी कपडे फाडण्याच्या आरोपाला पोलीसांनी नकार दर्शवला आहे.