रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : काँग्रेसची पहिली यादी २० तारखेला जाहीर होणार असून नवीन उमेदवारांना यात संधी दिली जाणार असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. बाळासाहेब थोरात यांनी झी 24 तासला यासंदर्भात माहीती दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजे विरोधात लढावे अशी काँग्रेसने विचारणा केली होती असा खुलासाही बाळासाहेब थोरात यांच्याकडून यावेळी करण्यात आला. राष्ट्रपिता केवळ महात्मा गांधी हे स्पष्ट करत मोदींची उद्या सभा आहे परंतु ते आर्थिक स्थितीवर बोलत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद देवरा विधानसभा लढवण्यास तयार नाहीत. १८-२० उमेदवार नवीन उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी झी 24 तासला सांगितले. तसेच ज्येष्ठांनी निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 



६० जागा युवकांना द्याव्यात अशी मागणी केली असून तरूण उमेदवारांना संधी मिळेल. यात तरूणींना १५ जागा देण्याची मागणी केल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले.