मुंबई : देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचं (Assembly Election 2022) बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) , पंजाब (Punjab) , उत्तराखंड (Uttarakhand) , गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. (assembly election 2022 election commission of india announced to uttar pradesh manipur punjab goa and uttarakhand assembly election schedule)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचही राज्यात एकूण 690 विधानसभा मतदारसंघामध्ये आणि एकूण 7 टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर पाचही राज्यात 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधासह आणि खबरदारी घेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.  



कोणत्या राज्यात किती टप्प्यात निवडणुका? 


उत्तर प्रदेश - 7 


पंजाब - 1


उत्तराखंड - 1


गोवा - 1


मणिपूर - 2 


कोणत्या राज्यात केव्हा होणार मतदान? 


यूपीत एकूण 7 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14,20, 23, 27 फेब्रुवारीला पहिल्या 5 टप्प्यातील मतदान पार पडेल. तर 3 आणि 7 मार्चला अनुक्रमे 6 व्या आणि 7 व्या टप्प्यासाठी उमदेवाराचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. 


मणिपूरमध्ये केव्हा होणार मतदान? 


मणिपुरात एकूण 2 टप्प्यात निवडणूका पार पडणार असून पहिला टप्प्यातील मतदान हे 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसरा टप्पातील मतदानप्रक्रिया 3 मार्चला पार पडेल. 


तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान


दरम्यान पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान होईल.  


कोणत्या राज्यात किती विधानसभा मतदारसंघ? 


उत्तर प्रदेश- 403


गोवा- 40 


मणिपूर- 60


पंजाब- 117 


उत्तराखंड- 70


उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती


- तर उर्वरित 3 राज्यातील उमेदवारांना 40 लाख रुपये निवडणुकींवर खर्च करण्याची मर्यादा


- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना माहिती द्यावी लागणार


- ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार


विधानसभा निवडणुकीबाबत महत्तवाचं


- 5 राज्यातील एकूण 18 कोटी 34 लाख मतदार मत देणार


-5 राज्यांमध्ये एकूण 2 लाख 15 हजार 368 पोलिंग बूथ


- कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करुन निवडणूका पार पडणार 


- 24 लाख 9 हजार मतदार पहिल्यांदा बजावणार मतदानाचा हक्क


- निवडणुकीसाठी एकूण 2 लाख 15 हजार 368 पोलिंग बूथ


- यंदा 15 टक्क्यांनी पोलिंग बूथमध्ये वाढ