नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या हाती आलेल्या कलानुसार भाजप पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्यात... मात्र, भाजप बहुमतापर्यंत मात्र पोहचू शकलेलं नाही. अशावेळी सर्वांच्या नजरा टिकून राहिल्यात त्या राज्यपालांवर... स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरलीय. सत्ता स्थापनेची संधी राज्यपाल कुणाला देणार, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. 


कोण आहेत वजुभाई?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळातील सर्वांच्या नजरा सध्या जनता दल सेक्युलर (जेडीएस) आणि कर्नाटकाच्या राज्यपालांवर टिकल्यात. त्रिशंकु अवस्थेत राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. याचं कारणं म्हणजे, राज्यपालांमुळेच गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिला होता... आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी संधी मिळाली होती. 


कर्नाटकच्या राज्यपालपदी सध्या गुजरातशी निगडीत असलेले वजुभाई वाला विराजमान आहेत. २०१२ ते २०१४ पर्यंत गुजरात विधानसभेच्या अध्यक्षपदी ते विराजमान होते. केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली होती. त्यांनी नरेंद्र मोदींसाठी आपली जागा सोडली होती. 


एकेकाळी वजुभाई भारतीय जनता पार्टीचे नेते होते. गुजरात सरकारमध्ये ते १९९७ ते २०१२ पर्यंत कॅबिनेट मंत्रीही होते. भाजप सरकारच्या काळात त्यांना अर्थ मंत्रालयही सोपवण्यात आलं होतं.  


कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोदीविरोधक एकवटताना दिसत आहेत. कर्नाटकातील बहुमताचा आकडा ११२ च्या खाली आल्यानंतर, राजकीय चित्र बदलत आहे. जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी म्हणून, बंगालमधून ममता बॅनर्जी, आंध्रमधून चंद्राबाबू नायडू यांनी जेडीएसचे एचडी दैवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. एकंदरीत जोपर्यंत भाजप कर्नाटकात सत्तेच्या जवळ होता, तोपर्यंत विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा भाजप बहुमतापासून ६ जागांनी दूर गेला, तेव्हा विरोधक एकवटत आहेत. एकंदरीत तासाला परिस्थिती कर्नाटकाच्या राजकारणात बदलत आहे


कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकार स्थापनेच्या हालचाली


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा सुरूवातीला ११३ जागांनी आघाडीवर होती. पण अचानक बहुमताचा आकडा ११२ च्या खाली भाजपाची संख्या गेली, तो त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणखी ६ आमदारांची कमतरता भासत आहे. यात ३ अपक्ष निवडून आले आहेत, तर जेडीएस आणि काँग्रेस यांचा आकडा मिळून बहुमताचा आकडा पार होवू शकतो, यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, सोनिया गांधी यांनी जेडीएसचे एचडी देवेगौडा यांच्याशी फोनवरून चर्चा सुरू केली आहे. काँग्रेस ७३ ठिकाणी आघाडीवर आहे, तर जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवर असलेल्या एकूण जागांची आकडेवारी ही ११४ होत आहे. काँग्रेस जेडीएसला सत्ता स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ शकते असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकाचा कल शेवटच्या टप्प्यात बदलल्याने राजकीय समीकरणं देखील बदलत आहेत, पण एवढ्यावर शांत बसतील ते भाजपाचे अध्यक्ष अमित शहा कसे, म्हणून अमित शहा देखील यावर पुढची कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.