नवी दिल्ली :  कॉंग्रेसने आज विधानसभांच्या निकालांबाबत वृतवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये आपले प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थितीचा विचार करता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांसोबत राहणार कॉंग्रेस
कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे, की, देशातील कोरोना संसर्गाची बिकट परिस्थिती पाहता, कॉंग्रेस पक्ष वृत्तवाहिन्यांवरील निकालांच्या चर्चांमध्ये सहभागी होणार नाही.



कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी
भारत एका अभुतपूर्व संकटाचा सामना करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरत आहे.  याबाबत सरकारला जाब विचारण्याऐवजी, वृत्तवाहिन्यांवर चर्चा करणं आम्हाला योग्य वाटत नाही, त्यामुळे तेथून माघार घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.


पुढे त्यांनी म्हटले की, माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्यास त्या उपलब्ध करून दिल्या जातील. आम्ही जिंकू शकतो किंवा पराभूतही होऊ शकतो. परंतु लोकांना ऑक्सिजन, रुग्णालये, बेड, औषध, वेंटिलेटर आदींची जास्त गरज आहे. आमचे कर्तव्य आहे की, आम्ही त्यांची मदत करावी.