मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly election Result 2022) हळूहळू जाहीर होत आहेत. पण या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण अनेक दिग्गज नेते पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत पिछाडीवर आहेत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री असलेले आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले नेते देखील पिछाडीवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्याचे मुख्यमंत्री पिछाडीवर


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) सध्या पिछाडीवर आहेत. सध्या गोव्यात भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपने प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. भाजपने राज्यात त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या. गोव्यात सध्या भाजपला बहुमत मिळताना दिसत असलं तर अजून पूर्ण निकाल येणं बाकी आहे.


पंजाबमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर 


पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) हे सध्या दोन्ही जागांवरुन पिछाडीवर आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे देखील पिछाडीवर आहेत. इतकंच नाही तर काँग्रेसचे दिग्गज नेते नवज्योत सिंग सिंद्धू हे देखील पिछाडीवर आहेत.


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पिछाडीवर


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami) हे देखील सध्या पिछाडीवर आहेत. उत्तराखंडमध्ये भाजप बहुमताकडे वाटचाल करत असली तरी मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत देखील पिछाडीवर आहेत.