नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हे राज्य आजापासून २ वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशामध्ये वाटलं जाणार आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे हे २ नवे केंद्रशासित प्रदेश आजपासून तयार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत ८७ जागांवर निवडणुका होत होत्या. ज्यामध्ये लडाखमध्ये ४, काश्मीरमध्ये ४६ तर जम्मूमध्ये ३७ जागा होत्या. लडाख पूर्ण केंद्रशासित प्रदेश असल्याने येथील ४ जागा आता रद्द होणार आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये ८३ जागा असणार आहेत. ज्यात आणखी बदल होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रशासित जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत ७ जागा वाढण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा जागा एकूण ९० होण्याची शक्यता आहे. जम्मूला न्याय मिळत नसल्याने येथील जागा वाढण्याची शक्यता आहे. जम्मूची लोकसंख्या ६९ लाख पण येथे विधानसभेच्या ३७ जागा आहेत. तर काश्मीरची लोकसंख्या ५३ लाख आहे. पण येथे विधानसभेच्या ४३ जागा आहेत.


३१ ऑक्टोबरनंतर निवडणूक आयोग लोकसंख्येच्या आधारावर नवीन मतदारसंघ तयार करु शकते. भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक गोष्टी लक्षात घेत मतदारसंघाची रचना केली जावू शकते.


पंतप्रधान मोदी यांनी नव्या काश्मीरचा नारा दिला आहे. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. ज्यामुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थावित होण्यास मदत होईल. जगातील सर्वात सुंदर स्थान असलेल्या काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना सतत अशांती पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यामध्ये त्यांना काही स्थानिक लोकांची देखील मदत मिळते. पण आतापर्यंत फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या येथील राजकारण्यांना चांगलाच धक्का बसला आहे.


काश्मीरमधील जनतेकडून देखील याचं स्वागत होत आहे. ज्यांना शांती, विकास आणि कामं हवे आहे. अशा लोकांकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे.