Earth Orbit: नासाने पृथ्वीच्या दिशेने जाणारा लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे 2019 ते 2023 या कालावधीत हा लघुग्रह पाचव्यांदा पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अॅस्टरॉइड (Asteroid 2020 PP1) नावाचा हा लघुग्रह येत्या ४८ तासांत पृथ्वीच्या जवळ पोहोचणार  असल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा लघुग्रह ताशी 14,400 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा आकार 52 फूट आहे. नासाचा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठी हानी होऊ शकते. पण पृथ्वीशी टक्कर होण्यासंदर्भात कोणतीही माहिती नासाने अद्याप दिलेली नाही.


यापूर्वी हा लघुग्रह 9 ऑगस्ट 2019, 5 ऑगस्ट 2020, 3 ऑगस्ट 2021, 1 ऑगस्ट 20232 रोजीचार वेळा पृथ्वीच्या जवळून गेला आहे . नासा दरवर्षी या लघुग्रहावर लक्ष ठेवते. यावर्षी ते 29 जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


लघुग्रह म्हणजे काय?


सौरमालेत लाखो लघुग्रह फिरत आहेत. लघुग्रहाला उल्का किंवा लघुग्रह असेही म्हणतात. ते एखाद्या ग्रहाचा किंवा ताऱ्याचा तुटलेला तुकडा मानला जातो. त्यांचा आकार लहान दगडापासून तो प्रचंड खडकांपर्यंत असू शकतो. 


लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत, जेव्हा या उल्का जळत्या स्वरूपात खाली येतात आणि पृथ्वीवर पोहोचतात, तेव्हा त्यांना उल्का पिंड असे म्हणतात. सामान्य भाषेत आपण याला तुटलेला तारा असे म्हणतात.


वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचे


वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याचे महत्त्व खूप जास्त आहे. कारण पहिले तर हे अत्यंत दुर्मिळ आहेत, दुसरे म्हणजे, आकाशात फिरणारे विविध ग्रह इत्यादींच्या संघटना आणि संरचनेबद्दल माहिती देणारे हे एकमेव थेट स्त्रोत आहेत.भूमंडलीय वातावरणात आकाशातून आलेल्या पदार्थावर पुढे काय प्रक्रिया होतात, हेदेखील याचा अभ्यास करुन आपल्या लक्षात येईल.