नवी दिल्ली : हरिद्वार येथे गंगा नदीमध्य़े आज माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं अस्थिविसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे अध्यक्ष अमित शाह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह आणि गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील यावेळी उपस्थित आहेत. भाजपचे जवळपास 5 हजार कार्यकर्ते अटल कलश यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.



माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात होते. 16 ऑगस्ट रोजी त्यांचं एम्स रुग्णालयात निधन झालं. वाजपेयींच्या नावावर योगी सरकार यूपीमध्ये 4 मोठे स्मारक बनवण्याच्या तयारीत आहे. यूपी सरकार लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव आणणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता.