लखनऊ : उत्तर प्रदेशात आपल्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी मारहाण केली. त्याला गावकऱ्यांनी खांबाला बांधले आमि त्यानंतर लाठ्या -काठ्यांनी मारहाण करण्यात आली. विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा ग्रामस्थांनी त्याला घेराव घातला तेव्हा त्याने आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. या गोळीबारानंतर लोकांचा संताप वाढला आणि त्याला पुन्हा जोरदार मारहाण करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण बस्ती जिल्ह्यातील डुबुलिया पोलीस ठाण्यातील उंजी गावाचे आहे, जिथे पोलीस निरीक्षक अशोक कुमार चतुर्वेदी गावात आपल्या प्रेयसीला भेटायला आला असताना गावकऱ्यांनी मारहाण केली. गर्दी इथेच थांबली नाही. इन्स्पेक्टरला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.


पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कसे तरी त्यांच्या इन्स्पेक्टरचे प्राण वाचवले आणि त्यांना पोलीस स्टेशनला नेले. गावकरी बराच वेळ इन्स्पेक्टरला शोधत होते. तो अनेकदा त्याच्या प्रेयसीला रात्री गावात भेटायला जायचा, पण काल ​​रात्री जेव्हा इन्स्पेक्टर प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला. तेव्हा तो सापडला.


त्यानंतर तो मुलीच्या घरात शिरला. जेव्हा गावकऱ्यांना संशय आला, तेव्हा त्या पोलिसाला रंगेहाथ पकडण्यासाठी घराबाहेर बसले. जेव्हा निरीक्षक रात्री 3 वाजता घराबाहेर आला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.


ग्रामस्थांचा आरोप आहे की स्वतःला वेढलेले पाहून अधिकाऱ्याने सरकारी रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने मोठ्या संख्येने गावकरी पोहोचले. प्रथम त्याला बेदम मारहाण करण्यात आली, नंतर त्याला दोरीने खांबाला बाधून आणखी मारहाण केली. 


घटनेची माहिती मिळताच एसपी आशिष श्रीवास्तव यांनी पोलीस स्टेशन गाठले. ते म्हणाले की, गावकऱ्यांनी एसआयवर गोळीबार आणि चारित्र्य हननचा आरोप केलाय. इन्स्पेक्टर गणवेशाशिवाय गावात गेला. त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.