नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. एम्स रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी केलं असून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं असल्याचं म्हटलं आहे. 11 जूनपासून माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक नेता म्हणून ते खूपच लोकप्रिय आहेत. त्यांना जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या कवितांना देखील मिळालं. त्यांच्या कविता वाचून अनेकांचा आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये कविता बोलून दाखवायचे. 


गेल्या अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान वाजपेयी यांना बुधवारी लाईफ सपॉर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं. जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. अनेक जण त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. जर आज अटल बिहारी वाजपेयी बोलू शकले असते तर त्यांच्याच एका कवितेतून त्यांनी स्वत:चं धाडस वाढवलं असतं.


1988 मध्ये जेव्हा वाजपेयी किडणीच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले होते तेव्हा धर्मवीर भारती यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी मृत्यूच्या डोळ्यात पाहून मृत्यूला हरवल्याची कविता लिहिली होती. आज पुन्हा एकदा ती कविता आठवते आहे. 'मौत से ठन गई'



1- ठन गई!
मौत से ठन गई!


जूझने का मेरा इरादा न था,
मोड पर मिलेंगे इसका वादा न था,


रास्ता रोक कर वह खडी हो गई,
यूं लगा जिंदगी से बडी हो गई।


मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं।


मैं जी भर जिया, मैं मन से मरूं,
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?


तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ,
सामने वार कर फिर मुझे आजमा।


मौत से बेखबर, जिंदगी का सफ़र,
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।


बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं,
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं।


प्यार इतना परायों से मुझको मिला,
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला।


हर चुनौती से दो हाथ मैंने किए,
आंधियों में जलाए हैं बुझते दिए।


आज झकझोरता तेज़ तूफ़ान है,
नाव भंवरों की बांहों में मेहमान है।


पार पाने का क़ायम मगर हौसला,
देख तेवर तूफ़ां का, तेवरी तन गई।


मौत से ठन गई।