Atal Bihari Vajpayee Death Anniversary :  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो कायम होते. आपल्या वक्तृत्वाने विरोधकांनाही पटवून देणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींनी लग्न का केलं नाही? तुम्ही आयुष्यभर बॅचलर राहण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेक वेळा त्यांना विचारला गेला. ते कधी यावर काही बोलले नाही. देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तेही प्रेमात पडले होते. (Atal Bihari Vajpayee Death Anniversary Why didnt Atal Bihari Vajpayee get married know love story)


...म्हणून त्यांनी लग्न केलं नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनीही आपल्या पुस्तकात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेमाबद्दल उल्लेख केलाय आहे. ते म्हणतात की, अटलजींच्या आयुष्यातही एक महिला होती, तिचं नाव होतं राजकुमारी कौल. 1940 मध्ये ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची मैत्री झाली. राजकुमारी कौल आणि अटल बिजारी वाजपेयी यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. अनेक वेळ एकत्र घालवल्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 


ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी लिहिलंय की, अटलजींनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी राजकुमारी कौल यांना प्रेमपत्र लिहिलं होतं. पण राजकुमारी कौल यांनी त्यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. उत्तराची वाट पाहत अटलजींनी लग्न केलं नाही. पुढे अटलबिहारी वाजपेयींनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकुमारी कौल यांच्या वडिलांनी तिचं लग्न प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी केलं. 


कुटुंबीयांचे असं म्हणणं आहे की...


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटल बिहारी यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं की, माजी पंतप्रधानांना लहानपणापासूनच देशसेवेची अनोखी आवड होती. ते संपूर्ण देशाला आपलं कुटुंब आणि संपूर्ण देश त्याचं घर मानत होते. त्यांच्या लग्नाबाबत असे म्हटलं जातं की, अटलजी देशसेवेच्या कामात इतके मग्न झाले की त्यांना लग्न करण्याची संधीही मिळाली नाही. एका मुलाखतीत अटलजींनी स्वतः सांगितलं होतं की, 'देश आणि देशातील करोडो लोकांच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना ते इतके व्यस्त झाले की त्यांना लग्नासाठी वेळच मिळाला नाही.'