ATM Card Insurance: एटीएम कार्ड ही काळाची गरज बनली आहे. अनेकदा लोक बँकेत जाऊन पैसे काढण्याऐवजी एटीएम कार्डमधून पैसे (Financial Transactions) काढण्याला पसंती देतात.  याशिवाय तुम्ही याद्वारे ऑनलाइन पेमेंटही करू शकता. तुम्हीही एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एटीएम कार्ड (ATM Card) वापरणाऱ्या ग्राहकांना 5 लाख रुपये दिले जातील असे बँकेने (Bank Facility) सांगितले आहे. होय, बँकेच्या या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही 5 लाखांचा फायदा कसा घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक सुविधा काय आहे?


सध्या देशातील बहुतांश ग्राहक एटीएम कार्ड (ATM Card) वापरतात. तर अशा परिस्थितीत 5 लाखांचा फायदा कसा घ्यायचा? ते आम्ही तुम्हाला सांगतो की, बँकेच्या वतीने एटीएम वापरकर्त्यांना विम्याची (Insurance) सुविधा दिली जाते.  एटीएम कार्ड असलेल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात. विमा हा देखील यापैकी एक आहे. बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड देताच, ग्राहकाला अपघाती विम्याची सुविधा मिळते. जरी अनेकांना या विम्याबद्दल माहिती नाही. एटीएम कार्ड जारी करताच ग्राहकाला अपघाती विमा ( Accidental Insurance)मिळतो. यासाठी कार्डहोल्डरच्या कुटुंबियांना अर्ज करणं आवश्यक असतं. 


इंश्योरन्स कोणाला मिळतो?


आरबीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेचे एटीएम धारकांना इंश्योरन्स मिळतो. पण ग्राहकाने एटीएम कार्ड किमान 45 दिवसांपूर्वी वापरत असणं आवश्यक आहे. म्हणजेच एटीएम कार्ड हाती मिळाल्यानंतर 45 दिवसानंतर अपघात झाल्यास इंश्योरन्ससाठी क्लेम करु शकतो.  एटीएमच्या इंश्योरन्सवर किती रक्कम मिळेल, हे सर्व एटीएम कार्डच्या श्रेणीवर अवलंबून आहे. बँक कार्डधारकांना वेगवेगळ्या श्रेणीनुसार इंश्योरन्स देते. कार्ड श्रेणी क्लासिक, प्लॅटिनम आणि सामान्य आहे. सामान्य मास्टरकार्डवर 50,000 रुपये, क्लासिक एटीएम कार्डवर 1 लाख रुपये, व्हिसा कार्डवर 1.5 ते 2 लाख रुपये आणि प्लॅटिनम कार्डवर 5 लाख रुपयांचा इंश्योरन्स मिळतो.


वाचा : टीम इंडियाला एकामागून एक मोठे धक्के, आता प्रशिक्षक बदलणार, 'हे' आहे कारण 


मृत्यूनंतरही मिळतात पैसे


एटीएम कार्ड (ATM Card) वापरणाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत इंश्योरन्स उपलब्ध आहे. दुसरीकडे, जर एका हाताला किंवा एका पायाला इजा झाली असेल, तर त्या प्रकरणात 50000 रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. कार्डधारकाच्या नॉमिनीला अर्ज बँकेत जमा करावा लागतो. 


कार्डनुसार पैसे उपलब्ध


• प्रधानमंत्री जन धन खात्यावर रुपे कार्ड उपलब्ध – 1 ते 2 लाख रुपयांचा विमा
• सामान्य मास्टरकार्ड – 50 हजार रुपयांचा विमा
• क्लासिक कार्ड – 1 लाख रुपयांचा विमा
• व्हिसा कार्ड – 1.5 ते 2 लाख रुपयांचा विमा
• प्लॅटिनम कार्ड – रु. 2 लाख
• प्लॅटिनम मास्टरकार्ड – 5 लाख रुपयांचा विमा