नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढताना अचानक कधीतरी एटीएम कार्ड मशीनमध्येच अडकतं. अशावेळी अनेकदा आपण घाबरुन जातो. परंतु काही सोप्या स्टेप्सनी कार्ड पुन्हा मिळवता येऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएम कार्ड, एटीएम मशीनमध्ये अडकल्यास याची सूचना तात्काळ आपल्या बँकेला द्या. कस्टमर केयरला फोन करुन एटीएमचं लोकेशन अर्थात ठिकाण, कार्ड अडकल्याचं कारण कळवावं.


कस्टमर केयरला फोन केल्यानंतर ते दोन पर्याय सांगतिल. कार्ड कॅन्सर करणं आणि दुसरा कार्ड पुन्हा घेण्याचा पर्याय. कार्डचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो असं वाटत असल्यास कार्ड कॅन्सल करा. 


बँक 7 ते 10 दिवसांत नवीन कार्ड ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवून देते. कमीत-कमी वेळेत कार्ड मिळण्यासाठी बँकच्या जवळच्या शाखेत भेट देऊ शकता. जर एटीएममध्ये अडकलेलं कार्डचं परत हवं असल्यास, बँकेला सूचना देऊ शकता. एटीएम तुमच्याच बँकचं असल्यास कार्ड परत मिळणं अधिक सोपं होईल. परंतु कार्ड दुसऱ्या बँकचं असल्यास, ती बँक तुमच्या बँकेत कार्ड पाठवते.


एटीएममध्ये कार्ड अडकण्याची तीन कारणं असू शकतात. पहिलं कारण, एटीएम लिंक फेल होणं, दुसरं कारण कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर पिन, पैसे फीड करण्यासाठी वेळ लागणं आणि तिसरं कारण मशीनचा पॉवर सप्लाय अचानक बंद झाल्यावरही कार्ड अडवू शकतं.


अडकलेलं कार्ड सर्वात आधी जो एटीएममध्ये पैसे अपलोड करतो त्याला मिळू शकतं. तो हे कार्ड बँकेत जमा करतो. हे सर्व आरबीआयच्या गाईडलाईन्सच्या अंतर्गत गोपनीयरित्या होतं. 


जर हे कार्ड दुसर्‍या बँकेचं असेल, तर ते कार्ड बँक संबंधित बँकेत पाठवेल. तुमच्या बँकेकडून तक्रार मिळाल्यानंतर, बँक शेवटच्या व्यवहाराची पावती घेऊन, तुम्हाला कार्ड परत करतात.