नवी दिल्ली : नवीन वर्ष २०२० सुरु झालं आहे. सरत्या वर्षांत सरकारकडून अनेक गोष्टींमध्ये, नियमांमध्ये बदल केले गेले. तर १ जानेवारी २०२० पासून अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. या गोष्टी, नियम आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. जाणून घ्या नवीन वर्षात होणारे काही महत्तावाचे बदल-


ज्वेलरी हॉलमार्किंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्या-चांदीच्या ज्वेलरी खरेदीवर हॉलमार्किंग अनिर्वाय असणार आहे. ग्रामीण भागांत १ वर्षापर्यंत सूट मिळणार आहे. सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा नियम २००० पासून लागू करण्यात आला आहे. पण हॉलमार्क अनिर्वाय करण्यात आला नव्हता. मात्र या वर्षापासून आता हॉलमार्किंग आवश्यक असणार आहे.


आधार-पॅन लिंक 


आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारिख होती. पण याचा वेळ आता वाढवण्यात आला आहे. मार्च २०२० पर्यंत आधार-पॅन लिंक करता येणार आहे. आधार-पॅन लिंक न केल्याने मोठ्या अडथळ्यांच्या सामना करावा लागू शकतो. 


विमा पॉलिसी 


IRDA ने चेंज लिंक आणि नॉन लिंक जीवन विमा पॉलिसीमध्ये बदलांची घोषणा केली आहे. यामुळे प्रीमियम महाग होणार आहे. एलआयसीनेही (LIC) क्रेडिट कार्ड पेमेंटवरील शुल्क हटवण्याची घोषणा केली आहे. 


चीप कार्ड 


जुनी डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक चिप कार्डमध्ये (EMV) बदलण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वेळ देण्यात आली होती. डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक चिप कार्डमध्ये बदलणं आवश्यक आहे. नवीन वर्षात जुन्या डेबिड कार्डवरुन पैसे काढता येणार नाहीत. 


एटीएममधून (ATM) पैसे काढताना ओटीपी 


एसबीआयने (SBI) एटीएममधून (ATM) १० हजारांहून अधिक रक्कम काढण्यासाठी नियमांत बदल केले आहेत. रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत पैसे काढण्यासाठी ओटीपी (OTP) अनिर्वाय असणार आहे.


फास्टटॅग 


१५ जानेवारी २०२० पासून राष्ट्रीय महामार्गावरुन (National Highway) जाणाऱ्या गाड्यांमध्ये फास्टटॅग अनिर्वाय असणार आहे. १ कोटी फास्टटॅग जारी करण्यात आले आहेत. फास्टटॅग न झाल्यास अधिक टोल भरावा लागणार आहे.