ATM Safety Tips: डिजिटल बँकिंग युगात सगळे व्यवहार कसे झटपट होत आहेत. रोख रक्कम काढण्यापासून ऑनलाईन माध्यमातून पैशांची देवाणघेवाण केली जात आहे. प्रत्येक बँकधारकाकडे एटीएम असतेच. या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करण्यासोबत रोख रक्कमही काढता येते. पण, एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करताना छोट्याशा निष्काळजीपणामुळेही लोक फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत खबरदारी घेणे आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएम वापरताना ही खबरदारी घ्या


-तुमचा पिन लक्षात ठेवा. ते कुठेही लिहू नका आणि कार्डवर तर अजिबात लिहू नका.


-तुमचे कार्ड तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे. तुमचा पिन किंवा कार्ड कोणासोबतही शेअर करू नका. अगदी तुमचे मित्र किंवा कुटुंबीयांसोबतही शेअर नाही.


-एटीएममधून पैसे काढताना, मशीनजवळ उभे राहा आणि पिन टाकताच कीपॅड आपल्या हाताने झाकून टाका, जेणेकरून तुमच्या मागे उभी असलेली व्यक्ती तुमचा पिन पाहू शकणार नाही.


-एटीएम कार्ड वापरण्यासाठी किंवा रोख रक्कम हाताळण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.


-एटीएममधून बाहेर पडण्यापूर्वी कृपया 'Cancel' बटण दाबा. तुमचे कार्ड आणि ट्रान्झॅक्शन स्लिप सोबत घेण्याचे लक्षात ठेवा.


-तुम्ही ट्रान्झॅक्शन स्लिप घेतल्यास, वापरल्यानंतर लगेच फाडून टाका.


-तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास ताबडतोब तुमच्या बँकेला कळवा.


-तुम्ही तुमच्या एटीएममध्ये चेक किंवा कार्ड वापरता तेव्हा काही दिवसांनी तुमच्या खात्यातील क्रेडिट एंट्री तपासा. तुम्हाला काही फरक दिसल्यास, तुमच्या बँकेला कळवा.


-जर तुमचे कार्ड एटीएममध्ये अडकले असेल किंवा सर्व नोंदी करूनही पैसे दिले जात नसतील, तर लगेच तुमच्या बँकेला कॉल करा.