पणजी : गोव्यात एटीएम सुरक्षा रक्षकाचा डीजीपींकडून आज सत्कार करण्यात आला. धाडस दाखवून एटीएम लुटीचा डाव या सुरक्षा रक्षकाने उधळून लावला होता.
ही संपूर्ण घटना एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम गोव्यात शनिवारी लुटण्याचा प्रयत्न झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएममध्ये एक व्यक्ती हातोडी घेऊन शिरली, यानंतर सुरक्षारक्षक रानू सिंगला त्याच्यावर संशय आला.तो व्यक्ती एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होता. हे आत जाऊन रानू सिंगनं पाहिलं, त्यावेळी रानू सिंगनं न घाबरता त्याला रोखलं. यात चोरट्याने रानू सिंगच्या डोक्यात हातोडीने वार केले. यात तो जखमीही झाला.


मात्र सुरक्षारक्षक आपल्याला बधणार नाही, हे लक्षात आल्यावर एटीएम लुटणाऱ्यानं अखेर पळ काढला. 


या घटनेची दखल घेऊन गोवा पोलिसांच्या वतीने सुरक्षा रक्षक रानू सिंगचा सत्कार करण्यात आला. गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या हस्ते रानू सिंगचा सत्कार करण्यात आला.सुरक्षारक्षकाच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.