उत्तर प्रदेशात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता !
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढग दाटून आले आहेत.
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढग दाटून आले आहेत. त्यामुळे वातावरण थंड झाले असून उन्हाचा प्रहर कमी झाला आहे. हवामान खात्यानुसार पुढील २४ तासात पाऊस येण्याची शक्यता आहे. राज्याच्या हवामान खात्यातील निर्देशक जे.पी. गुप्ता यांच्यानुसार मध्येच ऊन पडण्याची शक्यता आहे. वातावरणातील आद्रता कमी झाल्याने उन्हापासून सुटका होईल. दिवसाचे जास्तीत जास्त तापमान ३२ डिग्री असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याचा अंदाज:
हवामान खात्यानुसार मंगळवारी लखनऊचे कमीत कमी तापमान २०.५ डिग्री सेल्सियस होते. परंतु, जास्तीत जास्त तापमान ३२ डिग्री सेल्सियस असेल असा अंदाज आहे. मंगळवारी गोरखपूरचे तापमान २३.४ डिग्री तर कानपूरचे २२.२ डिग्री आणि बनारस, इलाहाबादचे अनुक्रमे २३ आणि २१.३ डिग्री सेल्सियस होते.