`बाबा` च्या डेऱ्याला संपत्ती दान करणाऱ्यांना कोर्टाचा धक्का
बलात्काराच्या आरोपात गुरमीत राम रहीम बाबाला २० वर्षे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. `बाबा` त्याच्या कर्माची फळ भोगत आहे पण बाबाच्या अनुयायी आता काळजीत पडले आहेत. या बाबा वर विश्वास ठेवून डेऱ्याला आपली संपत्ती दान केलेले अनुयायी सध्या चिंतेत आहेत. कारण `बाबा` ला शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने डेऱ्याला दान केलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सिरसा : बलात्काराच्या आरोपात गुरमीत राम रहीम बाबाला २० वर्षे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 'बाबा' त्याच्या कर्माची फळ भोगत आहे पण बाबाच्या अनुयायी आता काळजीत पडले आहेत. या बाबा वर विश्वास ठेवून डेऱ्याला आपली संपत्ती दान केलेले अनुयायी सध्या चिंतेत आहेत. कारण 'बाबा' ला शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने डेऱ्याला दान केलेली संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या अनुयायांनी दान केलेल्या संपत्तीचे पजेशन त्यांच्याकडेच असले तरीही प्रॉपर्टीचे मालकी हक्क डेऱ्याला देण्यात आले आहेत. ही माणस आताही त्याच घरांमध्ये राहत आहेत पण आता न्यायालयाची एक ऑर्डर त्यांना बेघर करु शकते.
डेरा प्रमुख राम रहिमच्या सांगण्यानुसार अनुयायांनी संपूर्ण प्रॉपर्टी डेऱ्याला दान केली किंवा गहाण ठेवली होती.
सरिसाच्या एका स्थानिकाकडून आरटीआयद्वारा मिळालेल्या माहितीनुसार खूप अनुयायी आमि साधूंनी आपली संपत्ती डेऱ्याला दान केली आहे.
साधुंकडून डेऱ्याला संपत्ती दान करण्याच्या कामाला१९९६ साली सुरुवात झाल्याचे २००२ मध्ये डेरा सच्चा सौदाशी नात तोडलेल्या गुरुदास सिंह तूरने यांनी सांगितले. या संपत्तीची पॉवर ऑफ अॅटॉनी डेरा प्रमुखाकडे आहे. त्यानंतर अनुयायांना समर्पणाच्या नावाखाली त्यांची संपत्ती डेरा प्रमुखाच्या नावावर करण्यास सांगण्यात यायचे असेही ते म्हणाले.