नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय. मंगलवारी दिल्ल सचिवालयात केजरीवाल यांच्यावर लाल मिरचीपूड टाकून हल्ला केला गेला. सचिवालयातच मुख्यमंत्र्यांवर हा हल्ला झाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच हाहाकार उडाला. 


अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर मीरचीपूड टाकणाऱ्या व्यक्तीचं नाव अनिल शर्मा आहे. तो दिल्लीच्या नारायणा भागात राहतो. सचिवालयाच्या आत केजरीवाल यांच्यावर लाल मिरची फेकताना अनितची पोलिसांसोबत हाणामारीही झाली. या दरम्यान या व्यक्तीनं मुख्यमंत्री केजरीवाल यांचा चष्माही तोडला. 


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुपारच्या जेवणासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अनिलला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केलीय.


आरोपी अनिल शर्मा

अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला


सचिवालयात केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी आलेला अनिल शर्मा बराच वेळ वेटिंग रुममध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिक्षा करत होतात. मिटिंग रुममधून केजरीवाल बाहेर आल्यानंतर अनिल शर्मा त्यांच्याजवळ गेला आणि त्यानं चक्क मुख्यमंत्र्यांचे पाय धरले. या दरम्यान केजरीवाल यांनी अनिल याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा चष्माही तुटला. पाय सोडल्यानंतर अनिल उठळा आणि त्यानं केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकली.