Atul Subhash Suicide: बेंगळुरुतील अतुल सुभाष या इंजिनिअरच्या आत्महत्येनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. अतुल सुभाषच्या पत्नीने त्याची छळवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याची पत्नी निकीता, तिची आई आणि भावाला अटक करण्यात आली आहे. अतुलने आत्महत्या करण्यापूर्वी एक 24 पानांची सुसाइड नोट आणि 80 मिनिटांचा व्हिडिओ केला होता. मात्र, अतुलने लिहलेली सुसाइट नोट आणि व्हिडिओ असलेली गुगल ड्राइव्ह लिंकमधील फाईल रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतुल सुभाषच्या आत्महत्याप्रकरणी बेंगळुरु पोलिस अधिक चौकशी करत आहेत. सुभाषची पत्नी निकीताला शनिवारी रात्री अटक केली आहे. मात्र त्याचबरोबर आता आणखी एक बातमी समोर आली आहे. अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर जवळपास आठवडाभरानंतर त्याने शेअर केलेल्या गुगल ड्राइव्ह लिंकमधील फाईल रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत. ज्या फाइल गायब झाल्या आहेत त्यात 24 पानांची सुसाइड नोट आणि टू मिलॉर्डस शीर्षक असलेले पत्र होतं. या पत्रात न्यायव्यवस्थेवर टीका करण्यात आली होती. 


अधिकाऱ्याने बोलणं टाळलं


या प्रकरणी अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, काही सोशल मीडिया युजर्सने आरोप केला आहे की, ड्राइव्हमधील काही अन्य फाइलल अद्यापही आहेत. मात्र, 'Death Knows No Fear' नावाची कविता, राष्ट्रपतींना लिहिलेली पत्र आणि एक घोषणा पत्र ज्यात त्याने म्हटलं होतं की निकिताने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे दस्तावेज अद्यापही ड्राइव्हमध्ये आहेत. काही सोशल मीजिया युजर्सने आरोप केला आहे की, गुगलच्या माध्यमातून फाइल हटवण्यात आले आहेत. पोलिस आणि गुगलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 


पत्नीला अटक


बेंगळुरुत इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या करण्याआधी पत्नीवर हिंसाचाराचा आरोप केला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी निकिता सिंघानीयाला हरियाणाच्या गुरुग्राममधून आणि तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या अलाहबादमधून अटक करण्यात आली आहे. एका अन्य पोलिस अधिकाऱ्याने याबाबत पुष्टी करत म्हटलं आहे की, तिघा आरोपींविरोधात अतुलच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी 3 कोटी रुपये आणि मुलाला भेटण्याचा अधिकार देण्यासाठी 30 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.