बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा 2024 कधी पासून सुरु होणार? जाणून घ्या डिटेल्स

| Dec 16, 2024, 15:34 PM IST

महाराष्ट्राच्या ग्रामीण कलात्मकतेचे, संस्कृतीचे दर्शन घडवणारी बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा परतली आहे. 

 

1/7

20 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ग्राउंड, सिंचन नगर, पुणे येथे ही जत्रा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण कारागीर आणि उद्योजकांना शहरी प्रेक्षकांशी जोडण्याची परंपरा कायम ठेवत ही जत्रा सगळ्यांचे स्वागत करायला सज्ज झाली आहे. 

2/7

हा महोत्सव 25 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत चालणार असून, पर्यटकांना ग्रामीण कारागिरी आणि नाविन्यपूर्णतेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळेल.  

3/7

यावर्षी, भीमथडी जत्रा पद्मश्री (कै.) श्री अप्पासाहेब पवार यांना त्यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देत आहे. त्यांच्या ठिबक सिंचन सुरू करण्यासह भारतीय शेतीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करणार आहे. प्रवेशद्वारावर टाइमलाइन डिस्प्लेद्वारे अप्पासाहेब पवार यांचे जीवन आणि कर्तृत्व प्रदर्शित दर्शवलं जाणार आहे.

4/7

सुनंदा पवार यांनी आयोजित केलेल्या भीमथडी जत्रा 2024 मध्ये एक लाखाहून अधिक पर्यटक येतील अशी अपेक्षा आहे. या वर्षीच्या कार्यक्रमात 325 स्टॉल्स असतील, त्यापैकी 70% नवीन असतील. कारागीर आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ग्रामीण उद्योजकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

5/7

शेतकरी उत्पादने विभाग, जीआय-प्रमाणित वस्तू, ताजे शेतमाल आणि मधासह 'रेसिड्यू-फ्री' उत्पादने हायलाइट करणारे मुख्य आकर्षण असेल. या उत्पादनांचे त्यांचे आरोग्य फायदे आणि टिकावूपणाबद्दल जागरुकता वाढवणे हे आहे.  

6/7

भीमथडी सिलेक्ट विभागात संपूर्ण भारतातील 12 राज्यांमधील 30 स्टॉल्स असणार असतील. इको फ्रेंडली कपडे आणि पारंपारिक तंत्रांचा वापर करून तयार केलेली जीवनशैली उत्पादने बघायला मिळतात. या वर्षी तेलंगणा प्रथमच जत्रेत सहभागी होणार आहे, जिथे ते प्रसिद्ध हातमाग आणि प्रादेशिक खाद्यपदार्थ सादर करणार आहेत.  

7/7

यंदाच्या जत्रेत महाराष्ट्रातील पारंपारिक कारागीर समुदायांना मान देणारा “बडा बलुतेदार” विभाग देखील समाविष्ट असेल. मोची, कुंभार आणि बांबू कारागीर यांच्या कार्यशाळा अभ्यागतांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हस्तकला आणि व्यवसायांची सखोल माहिती देतील.