ऑगस्ट महिन्यात `या` दिवशी शाळा कॉलेजला सुट्टी, पाहा Holiday List
School Holidays in August 2024: जुलै महिना हा अतिशय थकवणारा होता. या महिन्यात फार सुट्ट्या नव्हत्या. पण 2024 चा ऑगस्ट महिन्यात शाळा-कॉलेजला या दिवसात असेल सुट्टी.
August 2024 School Holiday List: ऑगस्ट महिना सुरु झाला की, शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अभ्यासक्रम भरपूर असतात. यामुळे हा महिना खास असतो. हा महिन्यात नव्या सेमिस्टरसोबतच विद्यार्थी शाळेत रुळू लागतात. ऑगस्ट महिन्यात कोणत्या सुट्ट्या आहेत त्याची यादी आपण आज पाहणार आहोत.
जुलै महिन्यात जवळपास फार सुट्टी नव्हतीचं. मात्र ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळणार आहे. यामुळे तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळेल. विद्यार्थी अभ्यास करुन थकल्यावर थोडा त्यांना या मधून आराम मिळू शकते. संपूर्ण भारतात रक्षाबंधन आणि कृष्ण जन्माष्टमी असे सण देखील या दिवसांमध्ये आहेत. त्यामुळे शाळा-कॉलेज बंद राहिल. महिन्याच्या 15 तारखेला भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन देखील साजरा केला जाणार आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये शनिवार आणि रविवारसह एकूण 11 सुट्ट्या आहेत. ही संपूर्ण यादी आहे. नियोजित सुट्यांव्यतिरिक्त, ऑगस्टमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रसंगी देखील चिन्हांकित केले जाते, जसे की जागरूकता दिवस, प्रमुख लोकांचे वाढदिवस आणि इतर विशेष कार्यक्रम. हे दिवस, जरी पारंपारिक सुट्ट्या नसल्या तरी, त्यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व समजण्यास मदत करण्यासाठी शाळांमध्ये साजरे केले जातात.
ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी
३ ऑगस्ट- केर पूजा- आगरतळा राज्यात बँका बंद राहतील.
4 ऑगस्ट- रविवार साप्ताहिक सुट्टी.
10 ऑगस्ट- महिन्याचा दुसरा शनिवार.
11 ऑगस्ट- रविवार साप्ताहिक सुट्टी.
13 ऑगस्ट- देशभक्त दिवस- मणिपूरमध्ये बँका बंद आहेत.
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन/पारशी नववर्ष (शहेनशाही) – भारतातील सर्व बँका बंद आहेत.
१८ ऑगस्ट-रविवारची साप्ताहिक सुट्टी.
१९ ऑगस्ट- रक्षाबंधन
२० ऑगस्ट- श्री नारायण गुरु जयंती.
२४ ऑगस्ट- महिन्याचा चौथा शनिवार.
२५ ऑगस्ट- रविवार साप्ताहिक सुट्टी.
२६ ऑगस्ट- जन्माष्टमी (श्रावण वद-8)/कृष्ण जयंती.