Crime News: पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरी नातेवाईकाबरोबर पळाली तर तिसरीची त्यानेच केली हत्या; पोलिसही चक्रावले
first wife died second wife eloped third murdered: तिसऱ्या पत्नीच्या आईने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.
Bihar Crime News: बिहारमधील औरंगाबादमध्ये हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस तपासादरम्यान पत्नीचा प्राण घेणाऱ्या या व्यक्तीची पूर्वी दोन लग्नं झाल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उपहारा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आहे. शेखपुरा गावामध्ये राहणाऱ्या सुबेलाल पासवानने तीन लग्नं केली होती. यापैकी पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. दुसरी पत्नी एका नातेवाईकाबरोबर पळून गेली आणि तिसऱ्या पत्नीची सुबेलालनेच हत्या केल्याचा आरोप आहे.
नातेवाईकांनी दाखल केली तक्रार
सुबेलालची तिसरी पत्नी चंद्रावती देवीच्या नातेवाईकांनी हा गंभीर आरोप केला आहे. चंद्रावतीच्या आईने जवायानेच मुलीची हत्या केल्याची तक्रार उपहारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीस स्टेशनेचे प्रमुख मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पटना जिल्ह्यामधील सिगोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जानपुर गावामधील रहिवाशी असलेल्या भगवान दयाल पासवान यांची पत्नी कुसमी देवी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. सध्या सुबेलालला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत.
पहिलं लग्न...
सुबेलालचं पहिलं लग्न गोह पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पुनदौल गावातील रहिवाशी अससेल्या गया पासवान यांची मुलगी लालती हिच्याबरोबर 2002 साली झाला होता. 2002 साली लालतीचा मृत्यू झाला. लालतीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्या करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी गावात रंगली होती.
दुसरं लग्न...
लालतीच्या मृत्यूनंतर सुबेलालने दुसरं लग्न गोह येथील तेयाप गावातील रहिवाशी असलेल्या जलेनद्र पासवान यांची मुलगी ममताबरोबर केला. लग्नानंतर अनेक महिन्यांनी सुबेलाल ममताला घेऊन दमणला गेला. तिथे तो एका खासगी कंपनीत काम करत होता. ममताला त्याने तिथेच राहण्यास सांगितलं. तो अनेकदा ममताला मारहाण करायचा. नेहमीच्या मारहाणीला कंटाळून ममता तिच्या एका नातेवाईकाबरोबर पळून गेली.
तिसरं लग्न...
यानंतर सुबेलालने तिसरं लग्न चंद्रावतीबरोबर केलं. 2018 साली झालेल्या या लग्नामध्ये चंद्रावतीच्या घरच्यांनी सुबेलालला हुंडा दिला होता. मात्र हुंड्याच्या ललसेपाई सुबेलालने पत्नीची हत्या केली. पुरावे नष्ट करुन मृतदेह जाळून टाकल्याचा आरोप मुलीच्या घरच्यांनी केली आहे. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करथ आहे. या तपासणीदरम्यान पहिल्या पत्नीच्या मृत्यूसंदर्भातील गूढही उलगडेल अशी चर्चा सध्या गावात आहे.