नवी दिल्ली : आजच्या भाषेत बोलायचे तर, औरंगजेब एक दहशतवादी होता, असे वक्तव्य भाजप खासदार महेश गिरी यांनी केले आहे. ते पूर्व दिल्लीतून संसदेवर भाजपचे प्रतिनिधित्व करतात. दिल्लीतील एका रस्त्याचे नाव बदलल्यावर गिरी यांना वीरता पुरस्काराने गौरविण्यात आले. या समारंभात बोलताना त्यांनी हे विधान केले.


उपराष्ट्रपती राहणार होते उपस्थित पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असे करण्यात आले. रस्त्याचे नाव बदलण्यात गिरी यांची भूमिका महतत्वाची राहिली. त्यामुळे त्यांना विरता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाचे उद्घटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार होते. मात्र, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.


...म्हणून बदलले रस्त्याचे नाव


महेश गिरी यांना विरता पुरस्कार मिळताच ते म्हणाले, 'मी जेव्हा औरंगजेब रोडवरून फिरत असे, पहात असे तेव्हा मला प्रचंड त्रास होत असे. जेव्हा औरंगजेबाचे राज्य होते तेव्हा आपली संस्कृती बर्बाद करण्याचेच काम त्याने त्यने केले. अनेक निरापराधांना ठार करण्यात आले. त्यामुळे एका शोषक करणाऱ्या व्यक्तीचे नाव एखाद्या रस्त्याला असूच कसे शकते? म्हणूनच या रस्त्याचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न करतण्यात आले. मी जेव्हा ही मोहीम हाती घेतली तेव्हा मला, धमक्या आल्या', असेही गिरी यांनी या वेळी सांगितले.


आता डॉ. अब्दुल कलाम रोड...


दरम्यान, महेश गिरी यांनी २०१५मध्ये पत्र लिहून या रसत्याचे नाव बदलण्याबाबत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पत्र लिहीले होते. औरंगजेब रोडचे नाव बदलून ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम असे ठेवण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. महेश गिरी यांचे पत्र मिळल्यावर एनडीएमीसीने या रस्त्याचे पत्र बदलले.