Who is Mohammad Juned Khan: मुंबई क्रिकेट टीमने इराणी कप जिंकला. 27 वर्षांनंतर मुंबईला ही कामगिरी करता आली. अंतिम सामन्यात रेस्ट ऑफ इंडियाला हरवल्यानंतर मुंबईने 15 व्या वेळा इराणी कप 2024 वर आपले नाव कोरले आहे. ईराणी कप 2024 मध्ये मुंबईच्या टीममध्ये अशा फास्ट बॉलरने डेब्यू केलाय ज्याच्या बॉलिंगकडून टीम इंडियाला अपेक्षा आहेत. हा बॉलर दुसरा कोणी नसून जुनैद खान आहे. 


कन्नोजचा रहिवासी मोहम्मद जुनैद खान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुनेद खान कन्नोजचा रहिवासी आहे. त्याच्यासाठी क्रिकेटचा प्रवास खूपच संघर्षमयी राहिलाय. क्रिकेटर बनण्याचं स्वप्न घेऊन जुनैद मुंबईत पोहोचला पण क्रिकेटर बनणं त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं.  मुंबईत स्थिर होण्यासाठी त्याला सुरुवातील ऑटो रिक्षा चालवावी लागली. 'द हिंदू'मध्ये त्याच्या संघर्षाची कहाणी देण्यात आली आहे. त्यानुसार जुनैद मुंबईत आला तेव्हा त्याचं वय 13 ते 14 वर्षे इतकं होतं. मुंबईत आल्या आल्या तो काम मिळवण्यासाठी फिरला. उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला रिक्षा चालवावी लागली. आपले घर चालविण्यासाठी तो अल्पवयीन असतानादेखील रिक्षा चालवून कमाई करत होता. 


ऑटोरिक्षा चालवत असतानाच तो संजीवनी क्रिकेट अकादमीत पोहोचला. मुंबईचे माजी विकेटकिप मनीष बंगेरा ही अकादमी चालवतात. जी जुनैदच्या घरापासून खूपच जवळ होती. तो कन्नौजमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. यानंतर तो संजीवनी क्रिकेट अकादमीतून खेळू लागला. बंगेरा यांनी त्याला बॉलिंग करताना पाहिलं होतं. त्यांना जुनैदची बॉलिंग आवडली होती. जुनैदने रोज येऊन बॉलिंगचा सराव करावा असे त्यांना वाटले. यासाठी त्यांनी जुनैदला आमंत्रित केलं. जुनैद रोज येऊन बॉलिंगची प्रॅक्टीस करु लागला. 


अभिषेक नायरनी ओळखला टॅलेंट, बनवलं केकेआरचा नेट बॉलर 
लॉकडाऊन दरम्यान टीम इंडियाचे सहायक कोच अभिषेक नायर ( त्यावेळी कोलकाता नाइट रायडरचे सहायक कोच होते.) जुनैद तेव्हा पोलीस शिल्डमध्ये पीजे हिंदू जिमखानासाठी खेळत होता. जुनैद आपल्या मुलाखतीत सांगतो की, अभिषेक नायर यांनी माझी खूप मदत केली. आज मी जे काही असेन ते त्यांच्यामुळेच आहे. ते नसते तर मी आज दुसऱ्या ठिकाणी असतो. आता जिथे आहे, तिथे नसतो. त्यांनी मला ऑटोरिक्षा न चालवता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. मी त्यांच्या अकादमीत ट्रेनिंग सुरु केली. त्यांनी मला मागच्या आयपीएल सिझनसाठी केकेआरचा नेट बॉलर बनवलं होतं,असेही जुनैदने सांगितले. 


स्थानिक टुर्नामेंटमध्ये दबदबा 


जुनैदने पीजे हिंदू जिमखानाचे प्रतिनिधित्व करताना आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं.हा त्याच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. जुनैदला संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने बुची बाबू आणि केएससी टुर्नामेंटसाठी निवडलं. यात त्याने खूप चांगला खेळ केला.. यानंतर त्याला इराणी कपमध्ये मुंबई टिममधून डेब्यू करण्याची संधी मिळाली. 


डेब्यूमध्ये दाखवला क्लास 


जुनैदने आतापर्यंत केवळ एकच फर्स्ट क्लास मॅच खेळली आहे. ईराणी कपच्या फायनलमध्ये तो रेस्ट ऑफ इंडियाच्या विरुद्ध खेळला. आपल्या डेब्यू फर्स्ट क्लास मॅचमध्ये मोहम्मद जुनैद खानने विरोधी टीमचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला आऊट केलं. जुनैद खानची ती मेडिन फर्स्ट क्लास विकेट होती. इथून त्याचा आत्मविश्वास वाढला. येणाऱ्या काळात त्याचा खेळ कसा होतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.