नवी दिल्ली : राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादावर अखेरचा तोडगा काढण्यासाठी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होत आहे.


त्रिसदस्यीय खंडपीठासमोर होणार सुनावणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 डिसेंबर 1992 ला अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वादावर तोडगा दृष्टीक्षेपात येत आहे. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दूल नझीर यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होणार आहे.


खटल्या संबंधी 13 अपीलं दाखल


याआधी अलाहबाद उच्चन्यायायालनं 2010मध्ये 2.77 एकर वादग्रस्त जमीनीचे तीन समान हिस्से करण्याचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण  13 अपीलं दाखल करण्यात आली आहेत. या सर्वांची एकत्र सुनावणी करण्यात येणार आहे. दरम्यान अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.