नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टात शुक्रवारी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर आज ७ वर्षांनंतर सुनावणी झाली.  यात सुप्रीम कोर्टाने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असून अंतीम सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणी दरम्यान या प्रकरणातील एक पक्ष सुन्नी वक्फ बोर्डने कोर्टाला सांगितले की, या प्रकरणाची संबंधीत दस्ताऐवज संस्कृत, पारसी, उर्दू, अरबी आणि काही इतर भाषांमध्ये आहे. याचा अनुवाद केला जात आहे. त्यामुळे यासाठी काही आणखी वेळ हवा आहे. 


त्यामुळे सुप्रीम कोर्ट पाच डिसेंबरपासून राम जन्मभूमी - बाबरी प्रकरणाची अंतीम सुनावणी होणार आहे. कोर्टाने यूपी सरकारला सांगितल की मालकी हक्काच्या वादाचा निर्णय करण्यासाठी नोंद झालेल्या साक्षींचे अनुवाद १० आठवड्यात पूर्ण करावे. तसेच सर्व पक्ष ज्या दस्ताऐवजांना आधार बनवत आहेत. त्यांचा १२ आठवड्यात इंग्रजी अनुवाद करावा. हे दस्ताऐवज आठ भाषांमध्ये आहे.