नवी दिल्ली : ayodhya अयोध्येमध्ये प्रस्तावित ram janmabhoomi राम मंदिर उभारणीसाठीच्या कामाला आता बराच वेग आला आहे. त्यातही मंदिराच्या भूमीपूजनाचा दिवसही जवळ येत असल्यामुळं विविध परिंनी प्रत्येकजण या मंदिर उभारणीमध्ये आपलं योगदान देत असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चारधामपैकी एक असणाऱ्या उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील माती आणि अलकनंदा नदीचं पाणी उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यासाठी पाठवण्यात आलं आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधी हे पाणी आणि माती अयोध्येपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेत सोमवारी ते मार्गस्थ झाले. 


राम जन्मभूमी मंदिर न्यासच्या वतीन देण्यात आलेल्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. एकिकडे राम मंदिर आकारास येण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच दुसरीकडे या कार्यात आर्थिक सहाय्य करण्यासाठीसुद्धा अनेकजण पुढे सरसावत आहेत. यातच आता मोरारी बापू यांचं नाव जोडलं गेलं आहे. आपल्या व्यासपीठाच्या वतीनं त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचं आर्थिक योगदान देणार असल्याचं जाहीर केलं आहे. 




दरम्यान, मंदिर उभारणी आणि त्यासंबंधीच्या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. राम मंदिर भूमीपूजनासाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सरसंघचालक मोहन भागवत यांना आणि इतरही काही नेत्यांना निमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.