Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचं 40 टक्के काम पूर्ण, या तारखेपासून दर्शन घेता येईल
दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीच्या कामाच्या आराखड्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
Ayodhya Ram Mandir Update: अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराबाबत (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राम मंदिराचं काम वेगाने सुरु असून डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल. तसेच जानेवारी 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान राम मंदिरात विराजमान होतील, असा अंदाज आहे. मंदिराबाबत ट्रस्टची दोन दिवसांची बैठक आजपासून आहे. बैठकीपूर्वी मंदिराबाबत ट्रस्टने माहिती दिली आहे. 2024 मकर संक्रांतीच्या दिवशी लाखो भाविक राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्री रामललाचे दर्शन घेतील. त्यामुळेच यावेळी होणारी विश्वस्त बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
एका अहवालानुसार मंदिराचे 40 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मंदिराचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. जानेवारी 2024 च्या मकर संक्रांतीला भगवान श्री रामलला विराजमान होणार आहेत. म्हणजेच 2024 मध्ये रामभक्तांची शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीच्या कामाच्या आराखड्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत झालेल्या निर्णयांचा अहवाल पीएमओलाही पाठवला जाणार आहे. त्यामुळे माजी आयपीएस अधिकारी आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्यासह 11 सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
रामजन्मभूमी संकुलात प्रवासी सुविधा उभारणी आणि सुरक्षा व्यवस्था यांच्यात त्याच्या संचालनाची व्यवस्था यावर चर्चा केली जाईल. त्याचबरोबर मंदिराच्या उभारणीसोबतच भाविकांसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे कामही सुरू झाले असून येत्या रामनवमीला भाविकांसाठी नवीन मार्ग खुला करण्यात येणार आहे.