Ayodhya Ram Mandir Photos : अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तुम्हाला राम मंदिराची भव्यता पाहायला मिळेल. राम मंदिराच्या उभारणीसाठी १८०० कोटी रुपये खर्च होऊ शकतात. राम मंदिराचे बांधकाम 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ते तयार होण्याची अपेक्षा आहे. जानेवारी 2024 पर्यंत (मकर संक्रांती) राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्रतिमेची पूजा केली जाईल अशी अपेक्षा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येच्या सुशोभीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि चौकही नव्या पद्धतीने तयार केले जात आहेत. रामभक्तांना मंदिर उभारणीच्या प्रगतीची जाणीव व्हावी यासाठी ट्रस्टकडून काही फोटो जारी करण्यात आली आहेत.



भव्य राम मंदिरात एकूण 12 दरवाजे असतील. हे सर्व दरवाजे सागवान लाकडाचे असतील. जानेवारी 2024 पासून भाविकांना रामललाचे भव्य मंदिरात दर्शन घेण्यास सुरुवात होणार आहे. 



मंदिराच्या गर्भगृहात 160 खांब बसवण्यात येणार आहेत. जो मंदिराचा आधार असेल. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर 132 खांब असतील. त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर 74 खांब बसवण्यात येणार आहेत.



आतापर्यंत राम मंदिराच्या उभारणीचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. राम लल्लाच्या गर्भगृहाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. अष्टकोनी गर्भगृहात आतापर्यंत पाचशे मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत.



गर्भगृह तयार करण्यात सुमारे 500 कारागीर आणि मजूर गुंतले आहेत.