Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: मुघल प्रशासक हे त्यांच्याकडून केला गेलेला छळ आणि क्रौर्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. मंदिरांवर केलेल्या हल्ल्यांपासून जबदरस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी मुघलांनी केल्याचे दाखले सापडतात. मात्र एखादा अपवाद असतो म्हणतात त्याप्रमाणे एक मुघल शासक असाही होऊन गेला ज्याने कट्टरतावादी विचारांऐवजी सौहदार्याची भूमिका घेतली. या मुघल शासकाचे वडील म्हणजेच हुमायूचं निधान झाल्यानंतर 1556 साली वयाच्या 13 व्या वर्षी तो मुघल प्रशासक म्हणून गादीवर विराजमान झाला. हे पद स्वीकरताना त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं. या प्रशासकाबद्दल लेखिका अनु कुमार यांच्या 'किंग्ज अॅण्ड क्वीन्स ऑफ इंडिया' पुस्तकामध्ये उल्लेख असून त्याच्या बालपणीचा बराचसा काळ वडील हुमायूबरोबर जागोजागी भटकण्यातच गेला असं म्हटलं आहे. आपण ज्या प्रशासकाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे अकबर!


12 व्या वर्षीच शस्रपारंगत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 12 व्या वर्षीच अकबराने घोडेस्वारी, ऊंटावर स्वार होणं आणि हत्तीवर नियंत्रण मिळवण्याची कला शिकून घेतली होती. तलवारीपासून अन्यही अनेक हत्यारं चालवण्यात हा चिमुकला पारंगत होता. हुमायूने त्याचा विश्वासू सरदार बैरम खान याला अकबराचा गार्डीयन म्हणजेच मार्गदर्शक आणि संरक्षण करणारा म्हणून नियुक्त केलं. बैरम खान हा स्वत: फारच क्रूर होता. 1556 साली जेव्हा मुघलांनी पानीपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये हेमूला बंधक बनवलं तेव्हा बैरम खानने 13 वर्षीय अकबराला त्याला गळा चिरण्यास सांगितलं होतं.


त्याने नकार दिला अन्...


इतिहासकार जॉन एफ. रिचर्ड्स यांनी अकबराने हेमूचा गळा चिरण्यास नकार दिला आणि तो टाळाटाळ करु लागला तेव्हा बैरम खानने स्वत:च्या हाताने हेमूचा गळा चिरला. मात्र नंतर बैरम खानचा हाच कट्टरतावाद अकबरला आवडेनासा झाला आणि त्याने बैरम खानला दूर केलं.


अकबर कट्टर नव्हता असा दावा


अकबर त्याच्या पूर्वजांप्रमाणे नव्हता. तो त्याच्या धर्मासंदर्भात फार कट्टर नव्हता. त्याला जेवढा विश्वास इस्लामवर होता. त्याने तेवढेच महत्तव इतर धर्म, संप्रदाय आणि विचारसरणींनाही दिलं होतं. अकबरच्या बऱ्याचश्या मोहिमा या हिंसक स्वरुपाच्या होत्या. तो विचारसणीबद्दल फारच प्रगतशील होता. अकबर प्रत्येक धर्माला सोबत घेऊन चालणाऱ्या विचाराचा होता, असं अनु कुमार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे.


सर्वांना समान वागणुकीचा विचार


एकदा अकबर स्वत: कट्टर विचारसणीच्या इस्लामिक धर्मपंडितांच्याविरोधात उभा राहिला होता. त्याने या धर्मपंडिताचे विचार पुरातन असल्याचं रोखठोकपणे म्हटलं होतं. अकबराचा 'सुलह-ए-कुल'वर विश्वास होता. या धोरणानुसार व्यक्तीचा धर्म, संप्रदाय आणि विचारधारेचा प्रभाव न पडू देता सर्वांना समान वागणूक दिली जायची. अकबरला हिंदू आणि ख्रिश्चन धर्मामध्ये फार रस होता. 'दीन-ए-इलाही' नावाचा नवीन धर्म सुरु करण्याचा विचार अकबराने केला तेव्हा खास करुन हिंदू आणि ख्रिश्नन धर्म अकबराने फार जवळून समजून घेतला. 


ख्रश्चन धर्मग्रंथ मागवला


इतिहासकार अदरीजा रॉय चौधरी यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या लेखात म्हणतात की, अकबराने एकदा त्याचा सर्वात निकटवर्तीय सल्लागार असलेल्या थीथर अब्दुल्लाच्या माध्यमातून गोव्यातील ख्रिश्चन मिशनरी प्रमुखांना संदेश पाठवला होता. तुमच्याकडील 2 सर्वात शिकलेल्या ख्रिश्चन धर्म पंडितांना ख्रिश्चन धर्मातील प्रमुख ग्रथांसहीत आपल्याकडे पाठवून द्यावे, असं अकबराने या संदेशात म्हटलं होतं. ख्रिश्चन मिशनरीने अकबराकडे एक मोठ्या आकाराचं मदर मेरीचं ऑइल पेटिंग पाठवलं होतं. तसेच बायबल हा धर्मग्रंथ भेट म्हणून पाठवला होता. अकबर हा बायबलमधील चित्रं पाहून येशू ख्रिस्तापासून फार प्रभावित झाला होता.


राम-सीतेची नाणी


याच कालावधीमध्ये अकबराने हिंदू मंदिरं उभारण्यास परवानगी दिली होती. त्याने अगदी जमिनीपासून ते आर्थिक मदतीपर्यंतचा हात या मंदिर उभारणीसाठी पुढे केला. त्याने राम टका हे विशेष नाणंही चलनात आणलं. अकबराने प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या प्रतिमा असलेली सोन्या-चांदीची नाणी जारी केली. गोल आणि चौकोनी आकाराच्या या नाण्यांच्या एका बाजूला राम-सीतेची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला ऊर्दूमध्ये 'अमदाद इलाही-50' असं लिहिलेलं होतं.



आता कुठे आहेत ही नाणी?


प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सध्या अकबराच्या कार्यकाळात जारी करण्यात आलेली राम-सीतेची मोजकी नाणी उपलब्ध आहेत. एक चांदी आणि 2 सोन्याची नाणी इंग्लंडमधील क्लासिकल न्यूमेसमेटिक ग्रुपकडे आहेत. काही नाणी बनारसमधील बीएचयूच्या भारत कला भवनाच्या संग्रहालयामध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.