Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धटनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.  येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (Ram Mandir Pran Pratishtha) देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान 15 हजार लिटर क्षमता असलेली आणि 2 हजार किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई नागपूरमध्ये तयार झालीये आणि ही कढई अयोध्येला जाण्यास सज्ज झाली. प्रसिद्ध शेफ  विष्णू मनोहर यांनी हि कढई तयार करून घेतली असून आकारामुळे या कढईला  हनुमान कढई असे नाव देण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘विश्‍वविक्रमी’ शेफ विष्‍णू मनोहर येत्‍या, 22 तारखेला श्री जगदंबा संस्‍थान कोराडी येथे 6 हजार क‍िलोचा महाप्रसाद तर अयोध्‍येत 26 जानेवारीनंतर 7 हजार क‍िलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागत‍िक विक्रम प्रस्‍थापित करणार आहेत.  28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान या कढईत एकाच वेळी 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा तयार केला जाणार आहे. दरम्यान हा प्रसाद प्रभू रामाच्या चरणी अर्पण करणार आहेत. 


रामलल्लाच्या अभिषेकसाठी देश-विदेशातून पाहुणे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला येणार आहेत. पाहुण्यांसाठी जेवणापासून ते निवासापर्यंत विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपली सेवा प्रभू रामाच्या चरणी करत आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येत प्रभू श्री रामचरमी एक आगळावेगळा विक्रम अर्पण करणार आहे.


राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागपूरचे निवासी शेफ विष्णू मनोहर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम भक्तांसाठी गोड प्रसाद तयार करणार आहेत. त्यासाठी त्यांची किंग साइज कढई त्यांच्यासोबत अयोध्येत घेऊन पोहचले आहेत.  ही कढई क्रेनने उचलली जाणार आहे. त्यांनी अयोध्येतील दहा लाखांहून अधिक राम भक्तांसाठी एकाच वेळी 7 हजार किलो प्रसाद बनवून नवा विक्रम घडवण्याचा निर्णय घेतला आहे.    


श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या काही दिवसानंतर विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल 7000 किलो शिरा (हलवा) तयार करणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास राम शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या राम शिरासाठी प्रचंड आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई सध्या नागपुरात तयार केली जात आहे.