trains to Ayodhya cancelled news In Marathi : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण या दिवसाच्या तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अशातच अयोध्येत जाणाऱ्या भक्तांसाठी नाराजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वे प्रशासनाने अयोध्या मार्गावरील सर्व गाड्या 7 दिवसांसाठी रद्द केल्या आहेत.


यामुळे ट्रेन रद्द 


दरम्यान, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युत लाईनच्या कामामुळे अयोध्येकडे जाणाऱ्या गाड्या 16 ते 22 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यामध्ये वंदे भारतसह इतर 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दून एक्स्प्रेससह ३५ गाड्या दुसऱ्या रुळांवरुन वळवण्यात येणार आहेत. याशिवाय इतर 14 रेल्वेचेही मार्गही वळवण्यात आले आहेत.


वंदे भारत ट्रेन 22 जानेवारीपर्यंत रद्द


अयोध्या कॅन्ट ते आनंद विहार अशी धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 15 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. हीच तारीख आणखी वाढवण्यात आली असून 22 जानेवारीपर्यंत गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या रेल्वे विभागाचे दुहेरीकरण प्राधान्याने केलं जातं आहे. अशी माहिती उत्तर रेल्वे लखनौ विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक प्रशासक रेखा शर्मा यांनी दिली आहे.


16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान कामानिमित्त या मार्गावरील ट्रेन क्रमांक 04203/04204 रद्द करण्यात आली आहे. तसेच, अयोध्या कांतरहून धावणारी आणि विविध ठिकाणी थांबणारी लखनौ मेलची सेवा देखील रद्द राहील.


तुम्‍ही अयोध्‍येला जाण्‍याचा विचार करत असाल तर त्या आधी प्रवासी हेल्पलाइन नंबर 139 वर डायल करून अधिक माहिती मिळवू शकता. किंवा तुम्ही enquiry.indianrail.gov.in वर ट्रेनचे तपशील देखील तपासू शकता.