अयोध्या : अयोध्येतील वादग्रस्त जमीनीबाबत सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. वादग्रस्त जमीन रामलल्लालाच देण्यात आलीय. रामाच्या अस्तित्वावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय. विशेष म्हणजे, या खटल्यात रामालाच पक्षकार करण्यात आलं होतं. अयोध्येतल्या रामजन्मभूमीप्रकरणी निकाल देताना ती वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयानं केले. दोन्ही बाजु समजून घेत समतोल राखत न्यायालयाने हा निर्णय दिला. या पार्श्वभुमीवर अयोध्येतील टेलर व्यवसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अयोध्येच्या निर्णयानंतर आता भक्तांकडून रामासाठी खास पोशाख बनवून देण्याच्या ऑर्डर वाढल्या आहेत. अयोध्योत भक्तांकडून सात दिवस सात रंगांचे पोशाख श्रीरामाला अर्पण केले जातात. या निर्णयानंतर या पोशाखांच्या ऑर्डरमध्ये वाढ झाली आहे.


श्रीरामाचे पोशाख शिवण्यात एक वेगळंच समाधान मिळत असल्याचं हे व्यावसायिक सांगतात.