Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला अयोध्येच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. मंत्रोच्चार आणि शंख नादात शुभ मुहूर्तावर रामलल्लांची भव्यदिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे. मात्र कार्यक्रमानंतर असे काही घडले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यादरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओंमध्ये एक व्हिडीओ असाही आहे ज्याची एकच चर्चा सुरु आहे. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यानंतर भव्य आरतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला. यानंतर जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी गर्भगृहाच्या बाहेर आले तेव्हा श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास आणि अन्य साधू संतांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. 


त्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर पंतप्रधानांनी एका सांधूंच्या पाया पडल्या. त्यानंतर दोघांमध्ये थोडा संवाद झाला. त्यानंतर साधूंच्या शिष्याने त्यांना एक सोन्याची अंगठी दिली. त्या साधूंनी सोन्याची अंगठी थरथरत्या हातांनी पंतप्रधान मोदींच्या बोटात घातली. साधूंकडून मिळालेल्या या आशीर्वादानंतर पंतप्रधानांनी पुन्हा त्यांना वाकून नमस्कार केला. याआधी पंतप्रधानांच्या हातात कोणतीही अंगठी नव्हती असे म्हटलं जात आहे. 


मंदिरातील एका साधूंनी पंतप्रधान मोदींना सोन्याची अंगठी दिली. श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर ही अंगठी देण्यात आली. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंगठीवर खिळल्या होत्या आणि लोकांना प्रश्न पडू लागला की ही अंगठी पंतप्रधान मोदींना का दिली गेली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केलेले सर्व संकल्प पूर्ण केले आहेत. पंतप्रधानांनीही प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच उपवास सोडला. त्यामुळे पंतप्रधान मोदींवर खूश असल्याने एका साधूंनी त्यांना सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली असावी, असं म्हटलं जात आहे.