`ताजमहालप्रमाणेच राष्ट्रपती भवनही गुलामीचं निशाण, तेही तोडावं`
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या `ताजमहाल`बाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. `ताजमहालसोबतच राष्ट्रपती भवनही पाडलं जायला हवं कारण तेही आपल्याला गुलामीची आठवण करून देतं` असं आझम खान यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या 'ताजमहाल'बाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'ताजमहालसोबतच राष्ट्रपती भवनही पाडलं जायला हवं कारण तेही आपल्याला गुलामीची आठवण करून देतं' असं आझम खान यांनी म्हटलंय.
'आपल्याला गुलामीच्या सगळ्याच प्रतिमा नष्ट करायला हव्यात ज्या आपल्याला आठवण करून देतात की कुणीतरी आपल्यावर राज्य केलंय. आपल्याला संसद, कुतुब मिनार, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला आणि आगऱ्याचं ताजमहालही नष्ट करायला हवं' असं आझम खान यांनी म्हटलंय.
बाबर, अकबर आणि औरंगजेब यांना संगीत सोम 'गद्दार' संबोधल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. इतिहास तोडून-मोडून त्याला लोकांसमोर सादर करून या लोकांना महापुरुष बनवलं गेलं, असं सोम यांनी म्हटलं. त्यांची नाव इतिहासातून पुसली जाऊन देशाचे खरे महापुरुष महाराणा प्रताप, शिवाजी यांना इतिहास आता शाळा-कॉलेजमध्ये मुलांना शिकवण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर करून टाकलं होतं.