मुंबई : उत्तर प्रदेशच्या जनपद शामलीमधील कैरानामध्ये राहणारे अडीच फूट उंचीच्या अजीम मंसरी यांना अखेर नवरी मिळाली आहे. अजीम यांच्या घरी आता आनंदाचं वातावरण आहे. अजीम याच्याप्रमाणे कमी उंचीची मुलीचं स्थळ आहे आहे. या दोघांचा साखरपुडा ठरवला असून 2022 मध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. साखरपुडा ठरल्यानंतर अजीमने सांगितलं की,'लग्न झाल्यावर तो पत्नीला घेऊन सर्वात आधी हजला जाईल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजीमच्या म्हणण्यानुसार, लग्नात तो सगळ्यांना आमंत्रण देणार आहे. यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव. त्यांची पत्नी डिंपल यादव आणि मुलांचा देखील समावेश असेल. 26 वर्षीय अजीम मंसूरी याची उंची 2 फूट 3 उंच असल्यामुळे त्याचं लग्न ठरत नाही. एक महिन्यापूर्वी त्याने लग्न होत नसल्यामुळे पोलिसांनाच आपलं लग्न ठरवण्याची विनंती केली होती. 



लग्न ठरण्यासाठी पोलिस स्थानकांत केलेला अजीम मंसूरी एका रात्रीत लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियावर त्याच्याच लग्नाची चर्चा होती. असं असताना   दिल्ली, गाजियाबाद, पंजाब, हरियाणा आणि गजरौला या ठिकाणाहून त्याला स्थळ येतं होती. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर त्याला प्रपोज देखील केलं जात होतं. 


हापूड निवासी राहणाऱ्या एका व्यक्तीने अजीम मंसूरीचे वडिल हाजी नसीम मंजूरी यांच्याशी संपर्क साधला. आपल्या 26 वर्षीय मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यांची मुलगी बीकॉम फर्स्ट इअरचं शिक्षण घेत आहे. अजीमचा लवकरच साखरपुडा होणार असून तो विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाचा असाही फायदा होतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.