नवी दिल्ली : सीमेवर देशाचं रक्षण करण्यासाठी भारतीय जवान प्राणपणाने लढत असतो. मात्र, एक जवान असाही आहे जो आपल्या मृत्यनंतरही देशाचं रक्षण करतोय. आश्चर्य वाटतयं ना? पण असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. पाहूयात काय आहे हा प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिक्कीमध्ये भारत आणि चीन सीमेवर एक भारतीय सैनिक आपल्या मृत्यूच्या ४८ वर्षांनंतरही देशाचं रक्षण करत आहे. ऐकायला आश्चर्य वाटेल पण येथील नागरिकांच्या मते हरभजनसिंग मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्हाला सत्य कळेल.


१३ हजार फुट उंचीवर आहे मंदिर


सिक्कीमची राजधानी गंगटोकमधील जेलेप्ला दर्रे आणि नाथुला दर्रे यांच्या दरम्यान बाबा हरभजन सिंग मंदिर आहे. हे मंदिर जवळपास १३ हजार फुट उंचीवर आहे. या मंदिरात बाबा हरभजन सिंग यांचा एक फोटो आणि त्यांचं काही सामान ठेवलं आहे.


असा झाला होता बाबा हरभजन सिंग यांचा मृत्यू


असं म्हटलं जात की, ४ ऑक्टोबर १९६८ मध्ये सिक्कीममधील नाथुला जवळ पोस्टींगवर असताना एका खोल दरीत भारतीय जवान हरभजन सिंग कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हरभजन सिंग यांचा आत्मा सीमेचे रक्षण करतात यावर नागरिकांचाही विश्वास आहे. आजही या ठिकाणी येणारे पर्यटक आणि जवान त्यांचे दर्शन घेतात.


चीनी सैनिकही घाबरतात


सीमेवर बाबा हरभजन सिंग हे उपस्थित असून ते देशाचं रक्षण करत असतात असा विश्वास भारतीय सैन्याला आहे. यासोबतच चीनचं सैन्यही ही गोष्ट मानतं आणि चीनी सैन्य घाबरतंही. चीनच्या सैनिकांनीही बाबा हरभजन सिंग यांना मृत्यू नंतर घोड्यावर बसुन सीमेवर गस्त घालताना पाहीलं आहे.


कपूरथला येथे राहत होते बाबा हरभजन सिंग


कॅप्टन हरभजन सिंग यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४१ मध्ये पंजाबमधील कपूरथला येथील बोंद्रल गावात झाला होता. त्यांनी १९६६ मध्ये २३वी पंजाब बटालियनमध्ये काम सुरु केलं.


४ ऑक्टोबर १९६८ रोजी टेकुला येथुन डेंगलचुकला मुख्यालयाकडे घोड्यावरुन जात होते. त्याच दरम्यान ते दरीत कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.


५ दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन 


हरभजन सिंग हे दरीत कोसळल्यानंतर त्यांचा शोध पाच दिवस सुरु होता. मात्र, त्यांचा शोध लागला नाही त्यामुळे त्यांना बेपत्ता घोषित केलं. त्यानंतर हरभजन सिंग यांनीच एका सैनिकाच्या स्वप्नात येऊन आपले प्रेत कुठे आहे ते सांगितलं असं बोललं जातं.