हरियाणा : दोन साध्वींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी सध्या गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी धरपडत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या समर्थकांद्वारे त्यानं याची चांगलीच फिल्डिंगही लावली होती. याचा खुलासा एका आरटीआयमुळे झालाय. 


हरियाणाच्या मेवातमधील एका आरटीआय कार्यकर्त्यानं गृह मंत्रालयाकडे पद्म पुरस्कारासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली होती. याच्या उत्तरादाखल दिलेल्या माहितीत, गृह मंत्रालयाकडे आत्तापर्यंत १८७८८ नावांची शिफारस आल्याचं समजतंय. 


यामध्ये, गुरमीत राम रहिमच्या नावाचाही उल्लेख आहे. ४२०६ जणांनी राम रहिमला पद्म पुरस्कार देण्यासाठी शिफारस केली होती. उल्लेखनीय म्हणजे, यापैंकी सर्वात जास्त शिफारशी सिरसा तुरुंगातून पाठवण्यात आल्या होत्या. इथंच डेरा सच्चा सौदाचं मुख्यालय आहे. 


पद्म पुरस्कारांसाठी अर्ज करण्यासाठी अजूनही दोन आठवड्यांचा कालावधी आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा २६ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.