मुंबई : पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) कोरोनावाचं औषध (Coronil) कोरोनिला शुक्रवारी 19 फेब्रुवारीला  लॉन्च केलं. तेव्हा बाबा रामदेव यांनी ANIला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "Coronil ला भारत सरकार तसेच World Health Organisation (WHO) ने सुद्धा मान्यता दिली आहे. त्याचंबरोबर कोरोनीला 150 देशात उपलब्ध करणार आहे.'',  पण आता WHO ने मात्र बाबा रामदेव यांना निराश केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO नुसार, त्यांनी COVID-19 च्या ईलाजासाठी कोणत्याही पारंपरिक किंवा आयुर्वेदीक औषधाला मान्यता दिलेली नाही. या गोष्टीला WHO ने TWITTER वरून दुजोरा दिला. यामध्ये WHO ने पतंजलीच्या Coronil चे जरी नाव घेतलेले नसले, तरी WHO ने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट केलं आहे, त्यामुळे हे TWEET Patanjali च्या Coronil साठीचं केलेले आहे, यात काही शंका नाही.


बाबा रामदेव यांच्यानुसार "कोरोनाची VACCINE मिळायला अजून वेळ आहे, ज्या लोकांना अजुनही  VACCINE मिळालेले नाही, त्या लोकांना कोरोनिल वापायला हरकत नाही, कोरोनिल हे इम्युनिटी वाढवायला तसेचं कोरोनाला नियंत्रित करण्यात खुप प्रभावी आहे."  विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह राष्ट्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी सुद्धा उपस्थित होते.


बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात कोरोनिल बद्दलं बोलताना पुढे म्हटलं आहे, कोरोनावायरस विरोधात कोरोनिलवर शोध पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांमुळे शक्यं झाले आहे. पुढे ते म्हणाले काही लोकं व्यवसायासाठी औषध बनवतात, पण आम्ही उपचारासाठी हे केलेलं आहे, एक दिवस WHO चं हेड ऑफिस भारतात बनावं अशी माझी ईच्छा आहे.